मित्रानो आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील लोकप्रिय साहित्यिक व.पु.काळे यांचे काही ;गाजलेले विचार आणि त्य्नाच्या काही खूप महत्वाच्या कोट्स. ज्यामुळे ज्ञानात भर तर पडतेच पण आयुष्याचे अनेक कंगोरे देखील सहजपणे समजून येतात. तर चला सुरु करूया आजच्या व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास या आजच्या खास आणि पहिल्या भागाला.
“माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा.”
यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते कि तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या वागण्याला जास्त महत्व आहे.
" चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे ?"
चोरी करणे हा गुन्हाच आहे मात्र ज्या चोरीने तुम्ही ज्याहक एकाहितरी चोरले आहे त्याला मनस्वी आनंद होत असेल तर हरकत नाही.
"मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते."
म्हणूनच तर माणसाच्या आयुष्यात आज्जीचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीजू मजा तिच्या हाताने गोडभाकरी खाण्यात यायची ती आज बर्गर पिझ्झा खाऊन पण लाभत नाही.
" क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते."
तुमचे कर्म हेच तुमची खरी ओळख आहेत. तेव्हा किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्व आहे.
मित्रानो आजच्या व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमची अमूल्य प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तेव्हा महा प्रपंच च्या इतर पोस्ट देखील आवर्जून बघा.
Post a Comment