Maha Prapanch

Latest Post

मित्रानो आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील लोकप्रिय साहित्यिक व.पु.काळे यांचे काही गाजलेले विचार आणि त्यांच्या काही खूप महत्वाच्या कोट्स. ज्यामुळे ज्ञानात भर तर पडतेच पण आयुष्याचे अनेक कंगोरे देखील सहजपणे समजून येतात. तर चला सुरु करूया आजच्या व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास या आजच्या खास आणि दुसऱ्या भागाला.




व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास भाग २




"खरं तर सगळे कागद सारखेच फक्त त्याला अहंकार चिटकला की त्याच सर्टिफिकेट होत "

माणसाने कधीही गर्व बाळगू नये. अहंकार हा माणसाला मातीतच घालत असतो. 

" भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे."

सगळंच पैशाने मिळवता येत नाही. मात्र अनेक गोष्टी पैश्यांशिवाय मिळवताच येत नाहीत. तरीही याचा समतोल राखायला आपण शिकले पाहिजे. 

" समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो."

समजून घेऊन स्वतः योग्य ते बदल घडवून आणणारा आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. 

" काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात. "

स्वतःच मोठेपणा मिरवणारे अनेकदा तोंडावर पडतात. जन्मजात कौशल्य असणारे शांतपणे काम करतात मात्र अंगात कसलेही गन नसणारेच अधिक उथळ वागतात. 

" जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे" 

प्रयत्नांती परमेश्वर असे उगाच म्हंटले जात नाही. त्यामुळे आपले प्रयत्न आपण नेहमी प्रामाणिकपणे सुरूच ठेवायला हवेत. 

मित्रानो आजच्या व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमची अमूल्य प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तेव्हा महा प्रपंच च्या इतर पोस्ट देखील आवर्जून बघा. 


मित्रानो आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील लोकप्रिय साहित्यिक व.पु.काळे  यांचे काही ;गाजलेले विचार आणि त्य्नाच्या काही खूप महत्वाच्या कोट्स. ज्यामुळे ज्ञानात भर तर पडतेच पण आयुष्याचे अनेक कंगोरे देखील सहजपणे समजून येतात. तर चला सुरु करूया आजच्या व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास या आजच्या खास आणि पहिल्या भागाला. 

व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास भाग १


माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा.

यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते कि तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या वागण्याला जास्त महत्व आहे.

 " चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे ?"

चोरी करणे हा गुन्हाच आहे मात्र ज्या चोरीने तुम्ही ज्याहक एकाहितरी चोरले आहे त्याला मनस्वी आनंद होत असेल तर हरकत नाही. 

"मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते."

म्हणूनच तर माणसाच्या आयुष्यात आज्जीचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीजू मजा तिच्या हाताने गोडभाकरी खाण्यात यायची ती आज बर्गर पिझ्झा खाऊन पण लाभत नाही. 

" क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते."

तुमचे कर्म हेच तुमची खरी ओळख आहेत. तेव्हा किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्व आहे. 

मित्रानो आजच्या व.पु.काळे आणि आयुष्याचा प्रवास हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमची अमूल्य प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तेव्हा महा प्रपंच च्या इतर पोस्ट देखील आवर्जून बघा. 




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget